• New

    चालू घडामोडी : 3 मार्च 2017


    3 मार्च: जागतिक वन्यजीव दिवस
    3 मार्च हा दिवस जगभरमध्ये जागतिक वन्यजीव दिवस (World Wildlife Day) म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाची संकल्पना लिसन टु द यंग वॉइसेस अशी होती. जगात जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण लोकांना धोक्यात आलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक अश्या दोन्ही पातळीवर कार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आहे.
    -          20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या (UNGA) 68 अधिवेशनात 3 मार्च हा दिवस संयुक्त राष्ट्र जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    -          या दिवशी म्हणजेच 3 मार्च 1973 रोजी वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात असलेल्या प्रजातींचा अंतरराष्ट्रीय व्यापार या वरील करार करण्यात आला होता.  (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora -CITES).
    -          पहिला जागतिक वन्यजीव दिवस (WWD) 2014 साली साजरा करण्यात आला.
    CITES
    धोक्यात आलेल्या वन्यप्राणी व वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित करार हा करार प्राणी व वनस्पती यांबाबत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित आहे. हा करार प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जीवप्रजाती धोक्यात तर येणार नाही, याची खात्री करतो. 1963 मध्ये झालेल्या IUCN च्या बैठकीमध्ये याचा मसुदा ठराव करण्यात आला होता. 3 मार्च 1973 रोजी त्यावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आणि जुलै 1975 मध्ये त्याची अमलबजावणी सुरू झाली. हा करार स्वीकारणार्‍या देशांवर कायदेशीररित्या बंधनकारक आहे.


    SWAATHI रडार
    डीआरडीओने स्वदेशी बनावटीचे शास्त्राचा शोध घेणारे रडार ‘SWAATHI’ भारतीय लष्कराकडे औपचारिकरीत्या सुपूर्द केले आहे.
    SWAATHI बद्दल
    -          डीआरडीओच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार विकास आस्थापनने विकसित केले.
    -          पल्ला : 50 किलोमीटर.
    -          दोन भूमिका : पहिली – शत्रूच्या शास्त्राचे स्थान दर्शाविणे. दुसरी- स्वतःच्या तोफाना दिशा दर्शाविणे.


    जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड
    ·       राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करण्यात आल्याचे आदेश जलसंधारण विभागाने जारी केले आहेत.
    ·       राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख 82 हजार 229 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून 12 लाख 51 हजार 713 हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे, तर चार हजार 786 गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत.
    ·       चालू वर्षी हे अभियान पाच हजार 292 गावांमध्ये राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
    या वर्षी निवडण्यात आलेली गावे विभागानुसार:  
    1.       औरंगाबाद विभाग : 1518
    2.       अमरावती विभाग : 998
    3.       नागपूर विभाग : 915
    4.       नाशिक विभाग : 900
    5.       पुणे विभाग : 825
    6.       कोकण विभाग : 136
    जलयुक्त शिवार अभियान
    राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे.


    चालक प्रशिक्षणासाठी मेरूकंपनीचा पुढाकार
    दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना दुचाकींची शास्त्रशुद्ध सर्व्हिसिंग करता यावी, त्यांच्यातून व्यावसायिक चालक तयार होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनने (ITI) पुढाकार घेतला असून यामाहा आणि मेरू कंपन्यांच्या सहकार्यातून दुचाकी सर्व्हिसिंग आणि चालक प्रशिक्षणाचा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम संस्थेत सुरू होत आहे. या उपक्रमातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


    आंदोलने आणि वादांमुळे गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाला (JNU) सर्वाधिक उत्तम विद्यापीठांच्या विभागात यंदाचा व्हिजिटर्स अवॉर्डजाहीर झाला आहे. ६ मार्चला राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.


    किम जॉन्ग नामचा केमिकल खून
    नुकतेच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जॉन्ग उन यांचा सावत्र मोठा भाऊ किम जॉन्ग नाम याचा मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे खून करण्यात आला. मलेशियाने त्यांचा खून करण्यासाठी व्हीएक्सया विषाचा वापर केल्याची घोषणा केली.
    काय आहे व्हीएक्स?
    व्हीएक्स म्हणजे इथाईल, बिस प्रॉपॅनॉ अमिनो सल्फानाईल फॉस्फॅटिनहे मज्जासंस्थेवर हल्ला चढवणारं न्यूरोटॉक्सिन आहे. आतंरराष्ट्रीय रासायनिक अस्त्रनियंत्रण संस्थेनं त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. हे विष म्हणजे फिकट पिवळा गंधहीन व रुचिहीन द्रवपदार्थ.


    वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात जुन्या जीवाश्मांचा शोध लावला असून कॅनडात शोधलेले सूक्ष्मजीवांचे हे अवशेष ३.८ ते ४.३ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या अवशेषात सूक्ष्म तंतू आणि ट्यूब्स आहेत. कॅनडातील क्विबेक शहरात एका चमकणाऱ्या दगडात हे अवशेष आढळून आले आहेत. हे सूक्ष्म जीव लोखंडावर राहत होते. असे जीव ३७७० दशलक्ष वर्षांपूर्वी आढळत होते, असे संशोधकांनी सांगितले. समुद्राच्या हायड्रोथर्मल सिस्टीममध्ये हे जीव राहत होते.


    आयसीईजीओव्ही 2017 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भारतात आयोजन
    ·       केंद्र सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघ विद्यापीठ आणि युनेस्को च्या सहकार्याने 7 ते 9 मार्च दरम्यान नवी दिल्ली इथे 10 व्या आयसीईजीओव्ही आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
    ·       माहिती समाजाची निर्मिती - डिजिटल शासनापासून डिजिटल सक्षमीकरणाकडेही या परिषदेची संकल्पना आहे.
    ·       केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन होणार असून पोर्तुगालच्या प्रशासकीय आधुनिकीकरण खात्याच्या मंत्री मारिया मॅन्युअल लिनाओ मार्क्वीस, भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पी.पी.चौधरी, मंत्रीमंडळ सचिव पी. के. सिन्हा तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यावेळी उपस्थित राहतील.
    ·       प्रादेशिक ज्ञानाचा वापर करुन डिजिटल शासनाची  डिजिटल सक्षमीकरणाकडे कशी वाटचाल होते हे पडताळून पाहणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.


    नेपाळ गुंतवणूक शिखर परिषद
    केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काठमांडू इथे 2 आणि 3 मार्चला झालेल्या नेपाळ गुंतवणूक शिखर परिषदेत सहभाग नोंदवला.
    त्यांच्या भाषणातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे :
    -          भारत नेपाळच्या व्यापार आणि गुंतवणुकीतील सर्वात मोठा भागीदार
    -          नेपाळचा 2/3 व्यापार भारताबरोबर होतो
    -          नेपाळमधील थेट परदेशी गुंतवणुकीत भारताचा वाटा जवळपास 40 टक्के
    -          दोन्ही देशांदरम्यान खुली सीमा असून, लाखो नेपाळी नागरीक भारतात राहतात आणि काम करतात.
    -          काठमांडू-निजगढ जलद मार्ग, निजगढ इथे दुसरे विमानतळ, कोषी धरण आदी प्रकल्पात गुंतवणूक करण्याची भारताची तयारी
    # नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष:  बिद्यादेवी भंडारी
    # नेपाळचे पंतप्रधान : पुष्प कमल दहल


    #राज्य मंत्रिमंडळ निर्णय 3 मार्च 2017
    ·       राज्यात मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास करण्यासह प्रभावी व्यवस्थापनाद्वारे मत्स्योत्पादनात दुपटीने वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने निलक्रांती धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 50 टक्के अर्थसहाय्याच्या 21 योजना राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मार्च 2017 रोजी मान्यता देण्यात आली. या योजनांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 29 कोटी 42 लाखाचा निधी मंजूर केला असून त्यापैकी निम्मा निधी राज्यास प्राप्त झाला आहे.
    ·       निलक्रांती धोरणानुसार राज्यातील भूजलाशये, सागरी व निमखारे क्षेत्रातील जलाशये यांच्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने वापर करुन शाश्वत पद्धतीने जैविक सुरक्षितता व पर्यावरणाचा समतोल राखून मत्स्योत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.


    पश्चिम बंगाल सरकारने द्रविडियन कुटुंबाशी संबंधित लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या कुरुख या आदिवसी भाषेला कार्यालयीन भाषेचा दर्जा दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये ही भाषा द्वार क्षेत्रात राहणार्‍या ओराण या आदिवासी जमातीकडून बोलली जाते.


    वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (Wildlife Crime Control Bureau) भारतातील वन्यजी प्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी 30 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2017 दरम्यान ऑपरेशन थंडर बर्ड यशस्वीरीत्या समन्वयित केले.  यासोबतच ब्युरोने 15 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2017 दरम्यान कसावावर विशिष्ट प्रजाती ऑपरेशन ऑपरेशन सेव्ह कुरमा आयोजित केले होते.



    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad