• New

    Current Affairs : 18 February 2017

    जीएसएलव्ही मार्क 3 रॉकेटसाठी सर्वांत मोठ्या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी
    §  भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीएसएलव्ही मार्क 3 साठी भारताच्या सर्वांत मोठ्या स्वदेशी उच्चस्तर क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी केली आहे. सदर चाचणी इस्रोच्या लिक्विड प्रॉपल्शन कॉम्प्लेक्स, महेंद्रगिरी (तामिळनाडू) येथे घेण्यात अली.
    महत्त्वपूर्ण मुद्दे
    @ सी25 स्तर इस्रो मार्फत विकसित करण्यात आलेले सर्वाधिक सक्षम उच्च स्तर इंजिन आहे. यामध्ये लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे. सी25 क्रायोजेनिक स्तर इस्रोला 4 टन पर्यंतचे उपग्रह सोडण्यास मदत करणार आहे.
    @ रशिया, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि भारत यांच्याकडेच क्रायोजेनिक आहे.

    इंडियन कोस्ट गार्डचे जहाज आयसीजीएस आयुष कार्यान्वयीत
    व्हाईस ऍडमिरल ए.आर. कर्वे यांच्या हस्ते भारतीय कोस्ट गार्डचे जहाज आयसीजीएस आयुषचे कोची (चेन्नई) येथे अनावरण करण्यात आले. हे जहाज कोचीन शिपयार्ड लि. ने तयार केले असून फास्ट पेट्रोल व्हेसल्स श्रांखलेतील 20 वे आणि अखेरचे जाहज आहे.

    आयएनएसव्ही तारिणी नौदलात दाखल
    §  भारतीय नौदलाची आयएनएसव्ही तारिणी ही दुसरी शीडनौका (sail) 18 फेब्रुवारी 2017 रोजी आयएनएस मांडोवी येथे नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे.
    §  आयएनएसव्ही तारिणीमधून भारतीय सर्व महिला खलाशी असणारा भारतीय नौदलाचा पहिला चमू जागतिक सागर परिक्रमा करणार आहे.
    §  या नौकेवर अद्ययावत संपर्क सुविधा बसवण्यात आली असून याद्वारे जगात कुठेही संपर्क स्थापित करता येईल.
    वैशिष्ट्ये
    -          या नौकेचे नाव ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातल्या विख्यात तारा-तारिणी देवालयाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
    -          संस्कृतमध्ये तारिणी या शब्दाचा अर्थ नौका असून तारा-तारिणी ही खलाशी आणि व्यापाऱ्यांची आश्रय देवता आहे.
    -          लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी या नौकेच्या कप्तान असून लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापती, लेफ्टनंट परापल्ली स्वाती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता हा चमू सागर परिक्रमा करणार आहे.
    -          तारिणीवर सहा शिडे (sail) असून तिची डोलकाठी (mast) 25 मीटर उंच आहे.

    ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संघटनेच्या शास्त्रज्ञांनी सोयाबीनचा वापर करून जगातील सर्वाधिक मजबूत घटक ग्राफिनची निर्मिती केली आहे. त्यांनी ग्राफएअर टेक्नॉलजी विकसित केली असून त्यामध्ये सोयाबीन ऑइलचे रूपांतर ग्राफिनमध्ये करण्यात आले.

    २०१७ च्या मान्सूनसाठी महाराष्ट्र शासनाचा क्लाऊड सिडींग प्रकल्प
    §  महाराष्ट्र शासनाने 250 कोटी रूपयांचा 2017 च्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस निर्मितीसाठी क्लाऊड सिडिंग प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
    §  या कार्यक्रमांतर्गत हवामानतज्ञ हवेतील ढगांमध्ये विमानाद्वारे सिल्व्हर आयोडाइड या रसायनाची फवारणी करणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्व्हर आयोडाइड या रसायनाचा वापर करतात.
    §  हा कार्यक्रम पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणार्‍या सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
    कलाउड सिडिंग म्हणजे काय?
    कलाउड सिडिंग तंत्रामध्ये सिल्वर आयोडाइड या रसायनाची ढगांवर फवारणी केली जाते. हे तंत्रज्ञान चीनने 2008 ऑलिंपिक दरम्यान पाऊस पाडण्याकरिता आणि प्रदूषण नियंत्रीत करण्याकरिता वापरले होते.

    लिंग निर्धारण जाहिराती हटविण्याच्या यंत्रणा तैनात करा: सर्वोच्च न्यायालय
    सर्वोच्च न्यायालयाने गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू या तीन इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना जन्मापूर्वी लिंग निर्धारणाच्या ऑनलाइन जाहिराती ओळखण्याकरिता आणि त्यांना हटविण्याकरिता त्यांचे स्वत:चे तज्ज्ञ मंडळ (In-House Expert Body) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सदर निर्णय न्या. दीपक मिश्रा आणि आर. बानुमती यांच्या खंडपीठाने दिला आहे. 1994 सालच्या गर्भधारणापूर्वी आणि जन्मापूर्वी निदान तंत्र (लिंग निवडीवर प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत कलम 22 अन्वये, यासंबंधित जाहिरातीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, तरीही ऑनलाइन जाहिराती दिसून येत असल्याची प्रकरणे आढळून येत आहेत.

    आर्थिक स्वतंत्रता निर्देशांकात भारत 143 वा
    अमेरिका स्थित थिंक टॅंक हेरिटेज फाउंडेशनने जाहीर केलेल्या आर्थिक स्वतंत्रता निर्देशांकात भारताला 143 वा क्रमांक मिळाला आहे. भारताला या निर्देशांकात 52.6 गुण प्राप्त झाले आहेत.
    महत्त्वपूर्ण मुद्दे
    -          पहिले पाच देश : हाँगकाँग, सिंगापूर,न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया
    -          2016 मध्ये भारताचा 123 वा क्रमांक होता.
    -          दक्षिण आशियाई देश: भूतान (107), श्रीलंका (112), नेपाळ (125), बांग्लादेश (128), पाकिस्तान (141), अफगाणिस्तान (163),  मालदीव (157).
    -          चीन 111 व्या तर अमेरिका 17 व्या स्थानावर
    -          जागतिक सरासरी गुण 60.9 असून 23 वर्षांच्या इतिहासात ही सर्वाधिक नोंद.
    -          भारताचा समावेश मोस्ट्ली अनफ्री श्रेणीमध्ये


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad