चालू घडामोडी : 2 जानेवारी 2017
शंकर
बालसुब्रमण्यम यांना नाईटहूड
·
जन्माने भारतीय असलेले केम्ब्रिज
विद्यापीठाचे डीएनए तज्ज्ञ व रसायनशास्त्राचे प्राध्यापक शंकर बालसुब्रह्मण्यम
यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून नाईटहूड या किताबाने गौरविण्यात आले आहे.
सध्या ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या वैद्यकीय रसायनशास्त्र विभागात हर्शेल स्मिथ
प्रोफेसर आहेत.
·
बालसुब्रह्मण्यम यांचे डीएनए
संशोधनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डीएनए क्रमवारी लावण्याच्या नवीन
तंत्राचा शोध लावला आहे. त्यांच्या या उलेखनीय कामगरीबद्दल त्यांना हा किताब
देण्यात आला आहे.
·
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ
द्वितीय यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना नाइटहूड
किताब दिला जातो.
शंकर बालसुब्रमण्यम
यांचा अल्प परिचय
-
जन्म : ३० सप्टेंर १९६६ रोजी
चेन्नई येथे झाला व नंतर १९६७ मध्ये ते ब्रिटनला गेले.
-
केंब्रिज विध्यपीठातून
पीएचडी
-
न्यूक्लिक अॅसिड मधील योगदानामुळे
ते जगभर ओळखले जातात
-
सध्या ते केंब्रिज
विद्यापीठात रसायन शास्त्राचे प्राध्यापक आहेत.
-
डीएनए क्वाड्राप्लेक्सेसचा
कर्करोगातील संबंध त्यांनी जोडून दाखवला व एपिजेनिटिक बदलावर नवीन प्रकाश टाकला
होता. सर शंकर बालसुब्रह्मण्यम हे रॉयल सोसायटीचे फेलो असून ते जन्माने भारतीय
असलेले ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत.
-
ब्रिटनमधील केम्ब्रिज
संस्थेत ते कर्करोग संशोधन गटाचे प्रमुख आहेत व ट्रिनिटी कॉलेजचे फेलोही आहेत.
-
केम्ब्रिज एपिजेनेटिक्स व
सोलेक्सा यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे.
-
त्यांना यापूर्वी
टेट्राह्रेडॉन पुरस्कार, कोर्ड-मार्गन पुरस्कार,
मलार्ड ग्लॅक्सो वेलकम पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.
भारतीय
ज्ञानपीठ नवलेखण पुरस्कार २०१६
·
दोन हिंदी लेखक श्रद्धा आणि घनश्याम
कुमार देवांश यांची २०१६ साठीच्या भारतीय ज्ञानपीठ नवलेखन पुरस्कारासाठी निवड
करण्यात आली आहे.
·
श्रद्धा यांची ‘हवा मे फडफडाती चिठी’ या लघुकथेसाठी तर देवांश यांची ‘आकाश मे देह’ या कवितेसाठी निवड करण्यात आली
आहे.
·
प्रसिद्ध कवि विष्णु नागर
यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली आहे.
भारतीय
ज्ञानपीठ नवलेखन पुरस्काराबद्दल
·
हिंदीमध्ये लेखन करणार्या
युवा लेखकांना त्यांच्या पहिल्या निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
·
भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट कडून
२००६ मध्ये या पुरस्करची स्थापना करण्यात आली.
·
सरस्वतीची मूर्ति, प्रशस्तीपत्र आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘हज कमिटी ऑफ इंडिया’ मोबाईल ॲप
·
केंद्रीय अल्पसंख्याक
राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते २
जानेवारी २०१६ रोजी मुंबई येथे हज हाऊसमध्ये ‘हज कमिटी ऑफ
इंडिया’ या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला आहे.
·
नवीन ॲपच्या माध्यमातून हज
यात्रेसाठी थेट अर्ज भरता येणार असून ‘ई-पेमेंट’ची महत्वपूर्ण सुविधाही ॲपवर उपलब्ध आहे.
हज यात्रा म्हणजे काय
?
हज या शब्दाचा अर्थ
आहे पवित्र स्थानाला भेट देणे. सौदी अरेबियातील मक्का या शहरात हज यात्रा भरवली
जाते. इस्लामी कॅलेंडरचा 12 वा महिना म्हणजे अल-हिज्जाह
या महिन्यात भरणारी ही यात्रा प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी करावी,
असं कुरानमध्ये म्हटलं आहे. हज यात्रा ही इस्लामच्या पाच
आधारस्तंभांमधील एक आहे. ते पाच आधारस्तंभ म्हणजे : 1. एकेश्वरत्व
आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे. 2. नमाज
प्रस्थापित करणे. 3. जकात अदा करणे. 4. रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे. 5. हज यात्रा
करणे.
अग्नी-4
ची यशस्वी चाचणी
·
आण्विक क्षमता असलेल्या अग्नी-४
या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने २ जानेवारी २०१६ रोजी यशस्वी चाचणी घेतली आहे.
·
ओडिशाच्या किनारपट्टीवरील
अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने एका रोड-मोबाईल प्रक्षेपकावरून
अग्नी-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
अग्नी-४
बद्दल
·
लांब पल्ल्याचे आंतरखंडीय स्वानातीत
क्षेपणास्त्र
·
जमिनीवरून जमिनीवर मारा
करण्याची क्षमता.
·
चार हजार किलोमीटर एवढ्या
अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता
·
संरक्षण संशोधन आणि विकास
संस्थेच्या वतीने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत हे क्षेपणास्त्र
विकसित
·
या क्षेपणास्त्राच्या
माध्यमातून अण्वस्त्रांचा वापर करता येऊ शकतो.
·
सुमारे एक टन स्फोटके वाहून
नेण्याची क्षमता
·
मध्यम ते लांब पल्ल्याच्या
अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतील हे चौथे क्षेपणास्त्र
·
आतापर्यंत अग्नी-१, २, ३ ही तीन प्रकारची क्षेपणास्त्रे लष्करी
वापरासाठी सज्ज झाली आहेत.
धर्म,
जातीच्या आधारे मते मागता येणार नाहीत- सर्वोच्च न्यायालय
·
धर्म, जाती, जमाती आणि भाषा यांच्या आधारावर राजकीय पक्ष
मते मागू शकत नाहीत. निवडणूकसंबंधी कायद्यांनुसार हा भ्रष्टाचार ठरेल, असा सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी २०१६ रोजी निर्णय दिला आहे.
·
सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर
यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 'जनतेच्या
कायद्याचे प्रतिनिधित्व' (Representation of People's Act) याअंतर्गत
कलम १२३ (३) नुसार हा निर्णय दिला.
·
हा निर्णय ४ विरुद्ध ३
अशा बहुमताने दिला असून सरन्यायाधीश
ठाकूर,
न्या. एम.बी. लोकूर, एन.एल. राव हे या
आदेशाच्या बाजूने होते. तर न्या. यू.यू. ललित, ए.के. गोयल
आणि डी.वाय. चंद्रचूड या तिघांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा होता.
·
त्यानुसार देशातील सर्व
राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना या आदेशातील मार्गदर्शक तत्त्वांचे कठोर
पालन करावे लागणार आहे.
काय
आहे कलम १२३ (३) ?
लोकप्रतिनिधित्वाच्या
१९५१ च्या कायद्यातील कलम १२३ (३) मध्ये निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराने अगर
त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या संमतीने इतर कोणी धर्म, जात, वंश, समुदाय किंवा भाषा
यांच्या आधारावर मत मागू नये, असे केल्यास तो निवडणुकीतील
गैरप्रकार मानला जाईल, असे सांगणारे हे कलम आहे. १९६१ मध्ये
दुरुस्ती झाल्यानंतर गेली ५६ वर्षे हे कलम कायद्याच्या पुस्तकात जसेच्या तसे आहे.
भारतीय वंशाची व्यक्ती किरगिझस्तानच्या
मेजर जनरल पदावर
·
किरगिझस्तान
सैन्याच्या मेजर जनरलपदी भारतीय वंशाच्या शेख रफिक मोहम्मद यांची निवड करण्यात आली
आहे.
·
मध्य
आशियाई देशांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका अधिकृत समारंभात किरगिझस्तानचे
संरक्षण मंत्री अली मिर्झा यांनी शेख रफिक मोहम्मद यांची मेजर जनरलपदी नियुक्ती
केली आहे.
·
शेख
रफीक मोहम्मद हे मूळचे केरळचे असून केरळमधील मल्ल्याळी व्यक्तीला दुसऱ्या देशाचे
सैन्याचे प्रमुखपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
·
रफिक
याआधी २००५ आणि २०१० मध्ये माजी राष्ट्रपती कुर्मानबेक सेलियेविच बेकियेव यांचे
सल्लागार होते.
·
रफिक
यांनी किरगिझस्तानमधील कर रचना सोपी आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला.
·
त्यांनी
संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी अरेबिया आणि किरगिझस्तानसाठी काम केले
आहे
अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून
हटविले
·
लोढा
समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास नकार देणार्या बीसीसीआयचे
अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारी
२०१७ रोजी पदावरून हाटवले आहे.
·
कोर्टाने
दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाई
करण्यात आली आहे.
·
मागील
वर्षी १८ जुलै रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार बीसीसीआयचे पदाधिकारी नियमानुसार
अपात्र ठरले होते. लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांना हटविण्याची मागणी
कोर्टाकडे केली होती.
·
बीसीसीआयच्या
नव्या पदाधिकाऱयांसाठी नाव सुचविण्यासाठी कोर्टाने फली नरीमन आणि गोपाल सुब्रमण्यम
या न्यायमित्रांची (अमायकस क्युरी) नेमणूक केली आहे.
·
अनुराग
ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली
कारणे:
१) क्रिकेट खेळात पारदर्शकता आणि विश्वासार्हता
निर्माण करण्यात बीसीसीआय आणि स्थानिक क्रिकेट बोर्ड अपयशी ठरले आहे.
२) कोर्टाने दिलेल्या आदेशांचे बीसीसीआयने पालन
केलेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत