चालू घडामोडी : 12 जानेवारी 2017
12 January 2017
आयएनएस
खंदेरी
·
स्कॉर्पीन वर्गातील दुसरी पाणबुडी
आयएनएस खांदेरीचे मुंबईतील मजगाव डॉक शिपयार्डमध्ये जलावतरण करण्यात आले आहे.
·
भारतीय नौसेनेच्या प्रकल्प
७५ अंतर्गत फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीच्या मदतीने सहा स्कॉर्पिन पाणबुडी
बांधणीच्या प्रकल्पातील ही दुसरी स्वदेशी पाणबुडी आहे.
·
१७ व्या शतकात मराठा
साम्राज्याचे अस्तित्व टिकवण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या खांदेरी किल्ल्याचे
नाव या नवीन पाणबुडीला देण्यात आले आहे. खांदेरी हे नाव टायगर शार्कचेही आहे.
आयएनएस
खांदेरीची वैशिष्टे
-
स्वदेशी बनावटीची पाणबुडी
-
कोणत्याही हवामानात काम
करण्याची क्षमता
-
जमीन व पाण्यातूनही ही हल्ला
करू शकते.
-
शत्रूच्या नजरेपासून वाचण्यासाठी
यामध्ये विशेष प्रणाली
-
पाणतीर आणि अन्य जहाजांचा
शोध लावणारी क्षेपणास्त्र यंत्रणा
-
18,000
टन वजन
पार्श्वभूमी
फ्रान्सच्या डीसीएनएस
कंपनीबरोबर ऑक्टोबर 2005 मध्ये झालेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण कररांतर्गत 6
पाणबुड्या माझगाव गोदीमध्ये विकसित केल्या जात आहेत. या पाणबुड्या नौदलाच्या
प्रोजेक्ट 75 अंतर्गत विकसित केल्या जात असून त्यापैकि पहिली आयएनएस कलवरीचे मागील
वर्षी जलावतरण करण्यात आले आहे.
गाइडेड
पिनाका अग्निबानची यशस्वी चाचणी
संरक्षण संशोधन आणि
विकास संस्थेने (DRDO) ओडिशातील चांदिपूर येथून
गाइडेड पिनाका अग्निबानची यशस्वी चाचणी घेतली आहे.
गाइडेड पिनाका ही पिनका अग्निबानची बदललेली
आवृत्ती असून ARDE पुणे, DRDL
हैदराबाद आणि RCI हैदराबाद यांनी
संयुक्तरित्या विकसित केले आहे.
हे अग्निबाण
दिशादर्शक, मार्गदर्शक आणि नियंत्रण उपकरणणी सुसज्य
आहे. या बदलल्या आवृत्तीत अचूकता आणि पल्ल्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
12
जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन
स्वामी विवेकानंद
यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा देशभरात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यासाठी 21 वा राष्ट्रीय युवक महोत्सव रोहताक (हरियाणा) येथे
साजरा करण्यात आला. 2017 मधील राष्ट्रीय युवक दिनाची थिम ‘युथ फॉर डिजिटल इंडिया’ अशी होती.
घानामध्ये येत्या 25
तारखेपासून 16 मार्चपर्यंत फेस्टिवल ऑफ इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या
महोत्सवात भारतीय शास्त्रीय नृत्य, सुफी आणि
लोकसंगीत, सप्तरंग या कार्यक्रमाचा समावेश आहे. याबरोबरच
महोत्सवामध्ये खाद्य महोत्सव, योगसाधना आणि ध्यानधारणा,
चित्रपट महोत्सवही होणार आहे. घानामधल्या चार शहरांमध्ये हा महोत्सव
भरविण्यात येणार आहे.
नटराजन
चंद्रशेखरन
·
टीसीएसचे मुख्य कार्यकारी
आणि विद्यमान संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून 12
जानेवारी 2017 रोजी घोषणा करण्यात आली.
·
टाटा सन्सच्या
अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्टोबर 2016 ला
हकालपट्टी केल्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी टाटासमूहाने रतन टाटा, वेणू श्रीनिवासन यांच्यासह पाच जणांची समिती स्थापन केली होती.
·
चंद्रशेखर यांच्या जागी
मुख्य वितीय अधिकारी राजेश गोपीनाथन यांची टीसीएसचे मुख्य कार्यकारी म्हणून निवड
केली आहे.
·
टाटा समुहाच्या 150
वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका बिगरपारशी व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कोण आहेत चंद्रशेखर?
-
एका शेतकरी कुटुंबात जून
1963 मध्ये जन्म
-
वडील श्रीनिवासन नटराजन
पेशाने शेतकरी व वकील
-
कोईमतूर इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीमधून विज्ञान शाखेची पदवी
-
त्रिचीमधील अभियांत्रिकी
महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमधून पदव्युत्तर पदवी
-
माहिती तंत्रज्ञान
कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या नॅसकॉमचे अध्यक्षपद
-
5 मार्च 2016 पासून ते
रिझर्व्ह बॅंकेचे संचालक (नॉन ऑफिशिअल)
-
चंद्रशेखरन टाटा समूहात 1987
मध्ये दाखल झाले.
-
2002 मध्ये त्यांनी ‘टीसीएस’च्या जागतिक विक्री विभागाची जबाबदारी
सांभाळली होती.
-
2007 मध्ये ते टीसीएसच्या
कार्यकारी संचालक झाले.
-
2009 पासून ते टीसीएसचे
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
जगप्रसिद्ध ई-टेलर
कंपनी ‘अमेझॉन’ने आपल्या कॅनडातील वेबसाइटवर भारताच्या राष्ट्रध्वजाशी
साधर्म्य असलेल्या पायपुसण्याच्या (डोअरमॅट) विक्रीची जाहिरात केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनने
अशा उत्पादनाची विक्री तातडीने थांबवावी; अन्यथा त्यांच्या
अधिकाऱ्यांना व्हिसा देणार नाही, तसेच ज्या अधिकाऱ्यांना
व्हिसा दिला असेल तो मागे घेऊ, असा दम दिल्याने अमेझॉनने
पायपुसण्यांची विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला.
२०१५ नंतर जन्मलेल्या
व्यक्तींना सिगारेटची विक्री करण्यात येणार नसल्याचा निर्णय रशियाच्या आरोग्य
मंत्रालयाने घेतला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावाला रशियाचे
अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे तंबाखूवर पूर्णपणे बंदी
आणणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे.
रशियाने धूम्रपान आणि
तंबाखू मुक्तीसाठी आणलेला नवा कायदा २०३३ मध्ये लागू होईल. कारण २०१५ साली आणि
त्यानंतर जन्मलेली मुले १८ वर्षांची झाल्यावर त्यांना हा कायदा लागू होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत