भरोसा कक्ष
§ कौटुंबिक
हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने ‘भरोसा कक्षा’चे नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. याच धर्तीवर राज्यभरात ‘भरोसा
सेल’ची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
काय
आहे भरोसा कक्ष?
@ हैद्राबादच्या
धर्तीवर महाराष्ट्रामध्ये भरोसा कक्ष सुरु करण्याचा पहिल्यांदा प्रयोग नागपूरमध्ये
करण्यात आला. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये या कक्षामध्ये
दोन्ही बाजूने समुपदेशन केले जाते. यानंतरही काहीच झाले नसल्यास रीतसर पोलीस
कार्यवाही केली जाते. या सेलमार्फत पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळते. २४ तास
हा कक्ष सुरु असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत