‘हज कमिटी ऑफ इंडिया’ मोबाईल ॲप
§ केंद्रीय
अल्पसंख्याक राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या
हस्ते २ जानेवारी २०१६ रोजी मुंबई येथे हज हाऊसमध्ये ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात
आला आहे.
§ नवीन
ॲपच्या माध्यमातून हज यात्रेसाठी थेट अर्ज भरता येणार असून ‘ई-पेमेंट’ची महत्वपूर्ण सुविधाही ॲपवर उपलब्ध आहे.
हज यात्रा म्हणजे काय
?
हज या शब्दाचा अर्थ
आहे पवित्र स्थानाला भेट देणे. सौदी अरेबियातील मक्का या शहरात हज यात्रा भरवली
जाते. इस्लामी कॅलेंडरचा 12 वा महिना म्हणजे अल-हिज्जाह
या महिन्यात भरणारी ही यात्रा प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी करावी,
असं कुरानमध्ये म्हटलं आहे. हज यात्रा ही इस्लामच्या पाच
आधारस्तंभांमधील एक आहे. ते पाच आधारस्तंभ म्हणजे : 1. एकेश्वरत्व
आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे. 2. नमाज
प्रस्थापित करणे. 3. जकात अदा करणे. 4. रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे. 5. हज यात्रा
करणे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत