• New

    P Notes

    पी-नोट्स म्हणजे गुंतवणुकीचा असा मार्ग आहे, ज्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदार नोंदणी करताच भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो. त्यासाठी देशात आधीच कोणत्याही विदेशी गुंतवणूकदाराच्या वतीने पी-नोट्समध्ये गुंतवणूक करण्यात आली असेल त्याच माध्यमाचा तो उपयोग करू शकतो. नोंदणीकृत गुंतवणूकदार पी-नोट्सच्या माध्यमातूून मिळालेला पैसा देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करतो.  

    P नोट्स बद्दल महत्वाचे मुद्दे: 
    • P Notesम्हणजेच Participatory Notes. 
    • P नोट्सलाच ‘OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENT’ असे म्हणतात.
    • हे instrument देशातल्या देशांत वापरले जात नाही.
    • P Notes CONTRACT नोट सारख्याच असतात.
    • FII (Foreign Institutional Investment) जी गुंतवणूक करतात त्यापैकी ६०% गुंतवणूक P नोट्सच्या माध्यमातून होते.
    P Notes एक गुंतवणुकीचा मार्ग

    काही विदेशी गुंतवणूकदारांना SEBI कडे रजिस्ट्रेशन करायचे नसते, पण त्याच्याकडे असलेला पैसा गुंतवण्यासाठी ते मार्ग शोधत असतात.त्यांना P Notes द्वारे गुंतवणूक करता येते

    कशी करतात P Notes द्वारे गुंतवणूक? 
    इंडियाबेस्ड ब्रोकरेजीस आणी FPI(FOREIGN PORTFOLIO INVESTORS) हे सेबीकडे रजिस्टर केलेले असतात. ते विदेशी गुंतवणूकदारांसाठी इंडियाबेस्ड सिक्युरिटीजची खरेदी विक्री करतात. आणी परदेशी गुंतवणूकदाराना P नोट्स इशू करतात आणी होणारा कॅपिटल गेन्स आणी लाभांश त्या गुंतवणूकदाराना ट्रान्स्फर करतात. म्हणजेच रजिस्ट्रेशन करता परदेशी गुंतवणूकदारांना P नोट्स द्वारे भारतीय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता येते.

    P Notes चे परिणाम ?
    1.       गुंतवणूकदाराची कोणतीही माहिती शासनाकडे नसते.
    2.        ठराविक सिक्युरिटीजचे BENEFICIAL मालक कोण हे समजत नाही.
    3.       अशा गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून पैसा काढून घेतला की मार्केट VOLATILE होते.
    4.       भारतीय गुंतवणूकदारांना सर्व नियम पाळावे लागतात पण विदेशी गुंतवणूकदारांना मात्र कोणत्याही अटी किंवा नियम पाळता पैसा कमवता येतो.
    5.       परदेशी नागरिकांना भारतीय ENTITIES ACQUIRE करता येतात किंवा त्यावर स्वतःचे कंट्रोल प्रस्थापित करता येते.  
    6.       NBFC(NON BANKING FINANCIAL COMPANY) च्या माध्यमातून अनलिस्टेड कंपन्यातही गुंतवणूक करता येते
    7.       P नोट्सच्या द्वारे बराच बेहिशोबी पैसा देशांत येण्याची शक्यता असते.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad