"टाल्गो'ची यशस्वी चाचणी
- स्पेनची हायस्पीड टॅल्गो रेल्वेगाडी भारतातील सर्वांत वेगवान रेल्वेगाडी ठरली आहे.
- "टाल्गो‘ने भारतातील आतापर्यंतच्या सर्वांत जलद अशा "गतिमान एक्स्प्रेस‘ला वेगामध्ये मागे टाकले आहे.
- 180 किलोमीटर प्रतितास चालणारी ही रेल्वे लवकरच भारतीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.
- भारतीय रेल्वे संशोधन निर्मिती व मानक संस्थेने (आरडीएसओ) याबाबत नुकतीच माहिती दिली.
- मथुरा-पलवल मार्गावर टॅल्गोची चाचणी झाली.
- देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांना या रेल्वेने जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंतच्या वेगवान गाड्या:
- टाल्गो एक्स्प्रेसचा सर्वाधिक वेग : 180 किलोमीटर प्रतितास
- गतिमान एक्स्प्रेसचा सर्वाधिक वेग : 160 किलोमीटर प्रतितास
- शताब्दी एक्स्प्रेसचा सर्वाधिक वेग : 150 किलोमीटर प्रतितास
- राजधानी एक्स्प्रेसचा सर्वाधिक वेग : 130 किलोमीटर प्रतितास
टाल्गोची वैशिष्ट्ये
- आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
- हाय व्होल्टेजची प्रकाशव्यवस्था
- महानगरांना जोडणारी वाहिनी म्हणून भविष्यातील ओळख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत