'निर्भय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारताने शत्रुच्या रडारला चकवणा-या ‘निर्भय’ या पहिल्या अण्वस्त्रसज्ज क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
-भारताने यापूर्वी रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे आणि २९० किलोमीटरचा मारक टप्पा गाठणारे क्रूझ प्रकारचे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या विकसित केले आहे.
-‘निर्भय’ हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) बंगळूरुस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंटतर्फे ते २००७ पासून विकसित केले जात आहे.
-झाडाच्या उंचीपासून अर्थात ५०० मीटरपासून १० किलोमीटर उंचीवरुन उड्डाण करणारे हे क्षेपणास्त्र रडारवर दिसत नाही.
-तसेच लक्ष्यावर प्रत्यक्ष धडकण्यापूर्वी काही वेळ विमानासारखे ते इमारतीभोवती किंवा डोंगराभोवती घिरट्याही घालू शकते.
-भारताने यापूर्वी १२ मार्च २०१३ रोजी ‘निर्भय’ या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी ओदीशातील चांदीपूर येथे केली. तेव्हा या क्षेपणास्त्राने उड्डाण व्यवस्थित केले परंतू १५ मिनिटातच ते अपेक्षित मार्गापासून भरकटल्याने ही चाचणी थांबवण्यात आली होती.
-‘निर्भय’ ची ही चाचणी यशस्वी ठरल्याने भारताने अमेरिकेच्या टोमाहॉक आणि पाकिस्तानच्या बबुरला चोख उत्तर दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत