• New

    पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रमेव जयते

    -पंडित दिनदयाल उपाध्यय 'श्रमेव जयते' कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चार योजनांचा शुभारंभ केला.
    -याचा उद्देश देशात तरूणांची कुशल पिढी तयार करणं हा आहे.
    -'मेक इन इंडिया' हे मोदी सरकारचं स्वप्न साकार करण्याची या मागची भूमिका आहे. -- - पंतप्रधान मोदींनी श्रम सुविधा पोर्टल, कंपन्यांसाठी युनिफाइड लेबर इन्सपेक्शन स्कीम आणि भविष्य निर्वाह निधी ( पीएफ ) जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच अकाउंट नंबर ( युनिव्हर्सल अकाउंट नंबर ) या योजनांची सुरूवात केली.

    पहिल्या योजनेनुसार देशातील साडे अकरा हजार औद्यागिक प्रशिक्षण संस्थां ( ITI ) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या म्हणजे किमान १६ लाख विद्यार्थ्यांना एक SMS पाठवून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला आहे. या SMS मधून स्किल डेव्हलपमेंटचा ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आलंय.

    दुसरी योजनेत भविष्य निर्वाह निधीच्या ग्राहकांसाठी युनीव्हर्सल अकाउंट नंबर ( UAN ) सुरू केला. या UAN नुसार प्रत्येक ग्राहक म्हणजे कर्मचाऱ्याला पीएफ खात्याची ऑनलाइन माहिती मिळवण्याबरोबरच पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्जही करता येणार आहे. काम करत असलेल्या किंवा काम केलेल्या कंपनीच्या माध्यमातून फॉर्म पुढे पाठवण्याची गरजही पडणार नाही. नोकरी बदलल्या नंतरही कर्मचाऱ्याचा UAN कायम राहणार आहे. त्या कर्मचाऱ्याला फक्त आपल्या नव्या कंपनीत हा UAN द्यावा लागेल. आतापर्यंत किमान ४.१७ कोटी कर्मचाऱ्यांचा UAN ईपीएफओने तयार केला आहे. हा १५ ऑक्टोबरपासून कामकाजात वापरला जाईल.

    तिसरी योजना ही सर्वांगिन कामगार सुधारणेची आहे. यानुसार कामगार मंत्रालयाने तयार केलेल्या एकिकृत श्रम पोर्टल आणि युनिफाइड लेबर इन्स्पेक्शन योजनेची सुरूवात करण्यात आली. पुढे जाऊन युनिक लेबर आयडेंटिफिकेशन नंबर ( LIN ) च्या माध्यमातून प्रत्येक उद्योगाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तसंच आपला रिटर्नही ते त्याच माध्यमातून भरू शकतील. लेबर इन्स्पेक्टरही आपला निरीक्षण अहवाल यावरच भरतील. लवकरच किमान ६ ते ७ लाख उद्योगधंद्यांना हा LIN दिला जाण्याची शक्यता आहे.

    चौथी योजना ही स्किल डेव्हलपमेंट अॅप्रेंटिसशिपशी संबंधित आहे. देशात औद्योगिक प्रशिक्षणासाठी ४.९ लाख जागा आहेत. तरिही फक्त २.८२ लाख विद्यार्थ्यांनाच अॅप्रेंटिसशिप मिळते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार अॅप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देणार आहे. यानुसार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा स्टायपेंड वाढवून अभ्यासातही अपेक्षित बदल केला जाणार आहे. यामुळे मार्च २०१७ पर्यंत किमान एक लाख प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल. तसंच पुढच्या वर्षापासून प्रशिक्षणासाठी असलेल्या जागांची संख्या वाढवून २० लाख करण्याचाही प्रयत्न आहे.

    'श्रमेव जयते'चे पाच मुख्य मुद्दे

    १. श्रम सुविधा म्हणजे युनिफाइड लेबर पोर्टल असेल. याद्वारे ६ ते ७ लाख उद्योगांना सेल्फ सर्टिफिकेशन आणि सिंगल ऑनलाइन रिटर्न भरण्याची सुविधा मिळेल. तसंच एक प्रभावी लेबर इन्स्पेक्शनची योजनाही असेल.

    २. कामगारांना PPF साठी UAN युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळेल. हा नंबर कंपनी बदलली तरी कायम असेल.

    ३. स्थानिक मागणी आणि आवश्यकतेनुसार निश्चित करून व्होकेशनल ट्रेनिंगची सुविधा दिली जाईल.

    ४. अॅप्रेंटिस प्रोत्साहन योजना ही याचाच एक भाग असेल. यानुसार तरूणांना रोजगार मिळणं सोपं होईल.

    ५. राष्ट्रीय आरोग्य विमा योजना असंघठीत क्षेत्रातील मजुरांसाठीही लागु केली जाईल.

    ©Balaji Surne
    Cell: 7387789138

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad