• New

    बेटझिग, मॉर्नर, हेल यांना रसायनशास्त्रातील नोबेल


    बेटझिग, मॉर्नर, हेल यांना रसायनशास्त्रातील नोबेल

    -सुक्ष्मदर्शीमधुन पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे सखोल स्वरूपात निरीक्षण करता येण्याची नवी पद्धत विकसित केल्याबद्दल
    -अमेरिकेच्या एरिक बेटझिग, विल्यम मॉर्नर आणि जर्मनीच्या स्टीफन हेल या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

    -या तीन शास्त्रज्ञांनी परंपरागत सूक्ष्मदर्शीच्या अत्युच्च क्षमतेपेक्षाही अधिक क्षमतेने पाहण्याची प्रक्रिया विकसित केल्याचे नोबेल पुरस्कार जाहीर करणाऱ्या रॉयल स्वीडिश ऍकॅडमी ऑफ सायन्सने म्हटले आहे.
    -या तिघांनी केलेल्या कार्यामुळे सूक्ष्मदर्शी विज्ञान एका नव्या पातळीवर गेल्याचेही या संस्थेने म्हटले आहे.
    -बेटझिग (वय 54) हे व्हर्जिनिया राज्यातील हॉवर्ड ह्युज मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात, तर मॉर्नर (वय 61) हे कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
    -जर्मनीचे स्टीफन हेल (वय 51) हे मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे संचालक आहेत.

    -गेल्या अनेक काळापासून सूक्ष्मदर्शकांना प्रकाशाच्या तरंगलांबीची मर्यादा पडत होती.
    -त्यामुळे 0.2 मायक्रोमीटरपेक्षा अधिक क्षमता आपण गाठू शकत नाही, असेच शास्त्रज्ञांना वाटत होते. मात्र, चमकत्या रेणूंच्या साह्याने या शास्त्रज्ञांनी ही मर्यादा ओलांडली. यामुळे आता रेणूंमधील रचनाही सूक्ष्मदर्शीतून पाहता येणार आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांनी शरीरातील वेगवेगळ्या पेशींवर अभ्यास करताना ही पद्धत विकसित केली.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad