खादी-ग्रामोद्योग आयोग विसर्जित करण्याचा निर्णय
नवी दिल्ली- खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) २४ जुलै २०१४ पासून विसर्जित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
"खादी व ग्रामोद्योग आयोग अधिनियमातील तरतुदीनुसार केव्हीआयसीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी आयोगाचे कार्यालय खाली त्वरित करावे", असे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने २५ जुलै रोजी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
त्याशिवाय २४ जुलै २०१४ पूर्वी आयोगाकडे असलेली सर्व मालमत्ता आणि निधी केंद्र सरकारकडे जमा करण्यात येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रोजगार निर्मितीसाठी उचललेले पाऊल
या संस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व तिला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम, कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले. खादी व ग्रामोद्योगांचा प्रसार करून ग्रामीण बिगर-कृषी क्षेत्रात रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत