• New

    एफआरपी म्हणजे काय?

    What is FRP?
    एफआरपी म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईज, अर्थात रास्त आणि किफायतशीर दर... साखर कारखाने उसाला प्रतिटन जो दर देतात किंवा पहिला हप्ता देतात, तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी एसएमपी (वैधानिक किमान मूल्य) म्हटलं जायचं. केंद्र सरकारने 22 ऑक्टोबर 2009 रोजी ऊसदर नियंत्रण कायद्यात दुरूस्ती करून वैधानिक किमान किंमत रद्द करून त्याऐवजी एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) घोषित केली. ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावर साधारण 15 टक्के नफा गृहित धरून एफआरपी कृषी आयोग हा दर निश्चित करतं. म्हणजेच, कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर साखर कारखाने देऊ शकत नाहीत. पण, एफआरपीपेक्षा जास्त दर द्यायचा असेल तर तशी तरतूद राज्य सरकार किंवा साखर कारखाने करू शकतात.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Bottom Ad